वृक्ष गणांचे कणे मोडले
बघ मातीचे दहन जाहले
हवा पाणीही विषार बनले
जंगलवासी मुठभर उरले
निसर्गहानी अशी अनावर
चराचराला शाप भयंकर
मानवा! थांबव ऋतुसंहार
स्मरोनी ब्रह्माचे उपकार
शामल धरती फुलू फळू दे
हिरवे पिवळे उभे डोलू दे
ऊन पावसा रंग खेळू दे
जीवाशिवाला हसुनाचू दे
मानवा! थांबव ऋतुसंहार
स्मरोनी ब्रह्माचे उपकार
— कवि शांताराम पवार
Advertisement




Recent Comments